Breaking

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

*हॉकीचा जादूगार" मेजर ध्यानचंद जयंती डॉ.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात साजरी*



मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना प्राचार्य, शारीरिक संचालक व प्राध्यापक वृंद



*श्रावणी माने : विशेष प्रतिनिधी*


    जयसिंगपूर : येथील डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

        २९ ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.मेजर ध्यानचंद म्हणजे हॉकीचे जादूगार,एक महान खेळाडू होते.त्यांनी भारताला जागतिक हॉकीच्या नकाशावर आणले.त्यांच्या कार्याची दखल घेऊन 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ' हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार दिला जातो.या व्यतिरिक्त त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दिला जातो.

        १९२८ चे एम्स्टरडेम ऑलिंपिक,१९३२ चे लॉस एंजिल्स आणि १९३६च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये भारताने सुवर्ण पदके मिळवून हॅटट्रिक केली त्याचे शिल्पकार मेजर ध्यानचंद होते.१९३६ च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये फायनलच्या सामन्यात त्यांनी जर्मनीविरुद्ध सहा गोल केले आणि सामना भारताने ८-१ असा जिंकला.अडॉल्फ हिटलर ध्यानचंद यांच्या खेळावर बेहद्द खूष झाला होता.हिटलरने त्यांना जर्मनी कडून खेळण्याचा प्रस्ताव दिला.मोठं आमीश दाखवलं पण देशप्रेमाने भारावलेल्या ध्यानचंदनी नकार दिला.

      कोणत्याही क्षेत्रात वेडं झाल्याशिवाय अद्वितीय कामगिरी होत नाही.चोवीस तास त्यांच्या डोक्यात हॉकी असायची.चांदण्याच्या शितल प्रकाशनात सुद्धा ते सराव करायचे त्यामुळे त्यांना ध्यानसिंग ऐवजी लोक ध्यानचंद म्हणू लागले.एका आंतरराष्ट्रीय सामन्यात टोकियो मध्ये जपानच्या टिमला अकरा गोलनी हरवलं त्यावेळी त्यांची स्टिक फोडून बघीतली,एवढं त्यांच्या स्टिकचं बॉलवर नियंत्रण होत.एका सामन्यात त्यांचे गोल होत नव्हते, वारंवार चूक होत होती.त्यांनी यजमानांना सांगितले की गोलपोस्टचे अंतर मोजा आणि खरंच गोलपोस्टचे अंतर चुकीचे होते.ध्यानचंद यांचे क्रीडांगणावरील खेळाचे प्रदर्शन अवाक करण्यासारखे होतं.त्यांचं बॉलवरील नियंत्रण,ड्रीबलींग,डॉजींग आणि गोल करण्याची पद्धत,स्टीक व बॉलचं कॉंबीनेशन अचंबीत करण्यासारखं होतं.म्हणून त्यांना हॉकीचा जादूगार म्हटलं जातं.

     कार्यक्रमासाठी, प्राचार्य, रजिस्टार, प्राध्यापक, प्राध्यापककेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर प्रा. नवनाथ पुजारी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा